महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी सातारा जिल्हा युवा सेना आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे व त्यांच्या आदेशाचे परिपूर्ण व तंतोतंत पालन केले जाईल.आज शासकिय विश्रामगृह कराड येथे युवासेना सातारा जिल्हाप्रमुख कुलदीप क्षिरसागर यांचे अध्यक्षतेखाली युवासेना पदाधिकारी मेळावा बैठक आयोजित करण्यात आली होती.सदर बैठकीत येथून पुढे युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब व पक्षप्रमुख व मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास आम्ही तयार आहे. नानासाहेब खाशाबा महाडीक तालुका प्रमुख पाटण , मोइसिन अयुब शेख तालुका अधिकारी कराड ,संभाजी सुभाषराव पाटील तालुका प्रमुख उत्तर, अक्षय राजेंद्र कुरकुल गवळी शहर युवा अधिकारी ,अक्षय संजय मोहिते कराड दक्षिण विधानसभा सम्वयक, अजय अंकूश देसाई पाटण विधानसभा प्रभूख, राहुल आनंदा वेताळ तालुका समन्वयक कराड-उत्तर, राहुल कृष्णाजी शेडगे, युवा विभाग अधिकारी ,
अक्षय गणपत कदम युवासेना उपतालुका प्रमुख , तुषार रामराव निकम उपविधानसभा समन्वयक – कराड उत्तर, रविराज बाबासाहेब शिंदे युवा सेना उपशहर अधिकारी, संतोष पांडुरंग काले संदीप आप्पासो पाटील कराड दक्षिण अधिकारी, राहूल श्रीरंग चाळके कराड दक्षिण विभाग अधिकारी, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज कराड मध्ये युवा सेनेच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये घोषणा करण्यात आली.