कराड : आगाशिवनगर, कराड येथील दुर्वा महिला उद्योग समूह संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा वनिता मोरे यांची राष्ट्रीय मानवाधिकार संस्थेच्या जिल्हा जनसंपर्क अधिकारीपदी निवड करण्यात आली. त्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
आगाशिवनगर येथील वनिता मोरे या दुर्वा महिला संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. मंदुळकोळे, ढेबेवाडी विभागासह मलकापूर आगाशिवनगर परिसरात वनिता मोरे यांनी सामाजिक बांधिलकीतून अनेकांना मदत केली आहे. या कार्याची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश डवरी, अनिल कचरे व कैलास थोरवडे यांच्या माध्यमातून त्यांची मानवाधिकार संस्थेच्या जिल्हा महिला जनसंपर्क अधिकारीपदी निवड करण्यात आली.
महिलांचे संघटन करून त्यांच्या अडीअडचणी सोडविणे तसेच अन्याय, अत्याचाराला वाचा फोडून पीडितांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही वनिता मोरे यांनी दिली. वनिता मोरे यांनी सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असतात. तसेच अनेक अडीअडचणीला सामोरे देखील जात असतात.