महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : बारामती / गणेश शिंदे हे शेतकरी कुटुंबातील असून बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथील असून यांना एलआयसीतील दर्जेदार कार्याबद्दल एमडीआरटी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. बारामतीचे शाखा प्रबंधक मुकुंद भाईक उपशाखा प्रबंधक अविनाश भावे आणि विकास अधिकारी चंद्रकिशोर भोसले यांचे अत्यंत मोलाचे सहकार्य मिळाले आहे. तसेच 2021 च्या अमेरिकेतील ऑरेन्स येथे होणाऱ्या जागतिक विमा परिषदेमध्ये गणेश शिंदे यांना उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे.
शिंदे हे गेली 14 वर्षे एलआयसी मध्ये विम्याच्या माध्यमातून आर्थिक नियोजनाचे काम करत आहेत. शिंदे यांनी काऱ्हाटी गावाला पाच वेळेला विमाग्राम करून गावाला 2 लाख 50 हजाराचे बक्षीस मिळवून दिले आहे.
मागील वर्षी म्हणजेच 2020 मध्ये शिंदे यांनी केलेल्या उल्लेखनीय व भरीव कामगिरीबद्दल एलआयसी कडून दिला जाणारा एमडीआरटी 2020 या सर्वक्षेष्ठ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.