महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (फलटण) : श्रीकृष्ण सातव
माझेरी पुनर्वसन ता.फलटण येथील जिल्हा परिषद शाळेतील तीन विद्यार्थ्यांणी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून त्या तीन विद्यार्थ्यांची निवड झाली आली आहे. विश्वराज गणेश पोमणे , अनुराग अजित शिंदे , विश्वनिल सचिन महामुनी यांनी जानेवारी २०२० मध्ये झालेल्या परिक्षेतून नवोदय विद्यालय,सातारा येथे निवड झाली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक भोलचंद सोमा बरकडे ,गणेश हौसेराव पोमणे यांनी मार्गदर्शन केले. फलटण पंचायत समितीच्या गटविकासअधिकारी -अमिता गावडे, गटशिक्षणाधिकारी -रमेश गंबरे, विस्तारअधिकारी -चनय्या मठपती, केंद्रप्रमुख -सुनंदा बागडे, मुख्याध्यापक- आडके यांच्यासह ग्रामस्थांनी पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.




















