लोणंद : सुजन फाऊंडेशनकडून खंडाळा तालुक्याचे डिजिटल पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष दै. तरुण भारतचे गणेश भंडलकर, उपाध्यक्ष हिंदू सम्राट चे मंगेश माने तसेच सचिव महाराष्ट्र न्युजच्या बिल्कीस पठाण शेख या नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सुजन फाऊंडेशनचे अध्यक्ष अजित जाधव बोलताना म्हटले की, सुजन फाऊंडेशन हे सामाजिक कार्यात अग्रेसर असून सुजन फौंडेशन ही सेवाभावी संस्था पंधरा वर्षे समाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. थोर महापुरुष यांच्या विचाराचे प्रसार व प्रचार, महिला सक्षमीकरण, प्रशिक्षण व मेळावा, शैक्षणिक क्षेत्र, जेष्ठ नागरीक, कलागुणांना वाव मिळावा याकरीता विविध स्पर्धा, वधुवर मेळावा, समाजातील विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करते. समाजहितासाठी स्मरणिका व थोर महापुरुष यांचे जीवनपट चरित्र प्रकाशित केले आहेत. भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव वर्षा निमित्त, स्वातंत्र्य चळवळीतील क्रांती कार्याला उजाळा, हुतात्म्याना अभिवादन, राष्ट्रीय एकात्मता व देशभक्तीपर विविध उपक्रम राबविणार आहे.