
याची फिर्याद हेडकॉन्स्टेबल संजय श्रीरंग बोबडे यांनी पोलिसात दिली आहे, संशयित आरोपी सचिन कदम, याला पाटण न्यायालया समोर हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती कोयना पोलिसांनी दिली.
याबाबत कोयनानगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की कोयना विभागातील ढानकल येथील सचिन मनोहर कदम, वय 32, याने शनिवार दिनांक 5 रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास माझ्या गल्ल्यातील पैसे व गांजा ची पुडी कोणी घेतली, ती तात्काळ आणून दे असे म्हणत पत्नी पल्लवी सचिन कदम वय 26 यांना मानसिक व शारीरिक त्रास देत, मारहाण करण्यात आली. तसेच पल्लवी हीचे केसाला धरून फरफटत आणून, तिच्या अंगावर रॉकेल ओतून धमकी दिली होती, मात्र नंतर होणारा मानसिक व शारीरिक त्रास सहन न झाल्याने पल्लवी हिने, स्वतः पेटवून घेतले व त्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या, त्यानंतर त्याने तात्काळ सातारा येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र पल्लवी यांची परिस्थिती अतिशय नाजूक असल्याने, त्यांना अधिक उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात नेत असताना, रविवारी दिनांक 6 रोजी सकाळी वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला.
या प्रकरणी पती सचिन मनोहर कदम, यांच्या विरुद्ध पत्नी पल्लवी हीस, मानसिक शारीरिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी, कोयनानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून. संशयित सचिन याला अटक करण्यात आली आहे. याचा अधिक तपास कोयनानगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ गायकवाड करत आहेत.





















