महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी फलटण
राज्यात इतरत्र व्यापाऱ्यांच्या दबावामुळे लॉक डाऊन उठवण्यात आल्याच्या घटना घडत असताना मात्र फलटण येथे दि १२ सप्टेंबर ते दि १७ सप्टेंबर या कालावधीत फलटण शहर पूर्ण बंद ठेवण्याचा फलटण व्यापारी संघटना यांनी निर्णय घेतला असल्याचा संदेश समाज माध्यमावर येथे फिरत आहे. त्यामुळे प्रशासना समोर वेगळीच समस्या निर्माण झाल्याचे जाणवते.
“दि ६ रोजी फलटण येथे झालेल्या व्यापारी संघटनेच्या सभेमध्ये दि. १२ ते १७ सप्टेंबर पर्यंत फलटण शहर पूर्ण चा बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने झाला असून मेडिकल व खत बियाणे यांची दुकाने सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत खुले राहतील बाकी इतर सर्व व्यवहार बंद राहतील तसेच दिनांक १८ सप्टेंबर पासून सर्व व्यवहार सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करून या संकटाचा नायनाट करण्याचा संकल्प करु या फलटण व्यापारी संघटना” असा संदेश समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे फलटण तालुक्यात सर्वत्र गोंधळ सदृश्य वातावरण निर्माण झाले. महसुल विभाग, पोलीस विभाग, नगर परिषद तसेच आरोग्य विभाग यांच्या अपरोक्ष फलटण बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी याबाबत प्रशासनाकडून शहर बंदचे निर्देश नसून व्यापारी संघटनेच्या बैठका मध्ये झालेला निर्णय असल्याचे दिसून येते असा खुलासा केला आहे. त्यामुळे फलटण बंद होणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सध्या जिल्ह्यात सर्वत्र आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असून असताना स्थानिक प्रशासनाला विश्वासात न घेता अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकते का हा प्रश्न निर्माण झाला आहे. सदरचा फलटण बंदचा निर्णय हा एकतर्फी असल्याचे चित्र दिसते. फलटण व्यापारी असोशियन तर्फे घेण्यात आलेल्या फलटण बंद चा निर्णय योग्य व नियमास धरून आहे का ? नसेल तर यावर प्रशासन काय कारवाई करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दि. १२ ते १७ सप्टेंबर फलटण बंद राहणार की प्रशासन याबाबत दुसरा कोणता निर्णय घेऊन फलटण बंदचा निर्णय रद्द करून यावर कारवाई करणार याकडे संपूर्ण तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Like this:
Like Loading...
Related