महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्याचे सहकार, पणन मंत्री तथा पालकमंत्री सातारा जिल्हा नामदार श्री.बाळासाहेब पाटील साहेब यांचे स्थानिक विकास निधी, डोंगरी विकास निधी व 3054 ग्रामीण मार्ग व विकास निधी योजना सन 2021-22 मधून खालील गावांमधील विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून सदरची कामे लवकरच सुरू होणार आहे.
यामध्ये स्थानिक विकास निधी मधून भूयाचीवाडी ता.कराड येथील नवीन गावठाण येथे अंगणवाडी शेजारील ग्रामपंचायत मालकीच्या खुल्या जागेत सभामंडप बांधणे 08.00 लाख, कवठे (जुने) ता.कराड येथे ग्रामपंचायत शेजारील जागेत सामाजिक सभागृह बांधणे रक्कम रू. 08.00 लाख, यादववाडी ता.कराड येथे हनुमान मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे रक्कम रू. 08.00 लाख, कचरेवाडी ता.कराड येथे शेडसहित वॉटर ए.टी.एम.(500 लिटर क्षमतेचे) युनिट बसवणे रक्कम रू. 03.00 लाख, कोर्टी ता.कराड येथे वॉर्ड नं.1 व वॉर्ड नं.4 मध्ये अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे रक्कम रू. 10.00 लाख, रिसवड ता.कराड येथे श्री.बाळकृष्ण शामराव इंगवले यांचे घर ते श्री.विलास गोविंद इंगवले यांच्या घरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणे रक्कम रू. 08.00 लाख, म्हासुर्णे ता.खटाव येथे खडीच्या मळ्यातील रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे रक्कम रू. 09.50 लाख, साठेवाडी ता.कोरेगांव येथे वॉर्ड नं.1 व वॉर्ड नं.2 मध्ये रस्ते काँक्रीटीकरण करणे रक्कम रू. 08.00 लाख, तसेच डोंगरी विकास निधी मधून जायगांव ता.कोरेगांव येथील जोतिबा मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे रक्कम रू. 08.00 लाख, वाठार (कि.) ता.कोरेगांव येथे मातंग समाजासाठी सामाजिक सभागृह बांधणे रक्कम रू. 08.00 लाख, रिकिबदारवाडी ता.कोरेगांव येथे मोरेवस्तीकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे रक्कम रू. 05.88 लाख त्याचबरोबर 3054 ग्रामीण मार्ग व विकास निधीमधून राज्यमार्ग 136 पासून गोवारे-सयापूर-टेंभू मार्ग ते रा.मा.142 अ रस्ता ग्रा.मा.124 साक्र.0/00 ते 3/00 सुधारणा करणे ता.कराड रक्कम रू. 44.07 लाख, वडुज-तडवळे रस्ता ग्रा.मा.128 सुधारणा करणे ता.खटाव रक्कम रू. 25.57 लाख अशा एकूण 1 कोटी 54 लाख रकमेच्या विकास कामांचा समावेश आहे.