महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सातारा, दि. ११ मार्च : गुरुवार दि. 10 मार्च रोजी झालेल्या पोलीस पाटील संघटनेच्या मसिक मिटींग दरम्यान सातारा तालुका पोलीस पाटील संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी दत्ता पवार (सैदापुर), उपाध्यक्षपदी महेश रोकडे (मर्ढे ), सहउपाध्यक्ष वैशाली गुरव (पोगरवाडी ), सचिवपदी विलास माने (मस्करवाडी), सहसचिव पदी निलीमा टोणपे (आरफळ) यांची निवड करण्यात आली.
तर संचालक कार्यकारिणीत संपत भोसले (सांबरवाडी) , जोतिराम पवार (धावडशी), मानाजी निकम (देगाव), शशिकला धोत्रे (संगम माहुली), दत्ता पाटील व संपत भोसले यांची निवड करण्यात आली.
तर जेष्ठ सल्लागार मार्गदर्शक समितीमध्ये बबनराव यादव (करंजे तर्फ परळी), अविनाश भोसले (कुशी), लक्ष्मण सावंत (चिंचणी), रमेश मोझर ( न्हाळेवाडी), गणपत शेडगे (पारांबे), लहू लोटेकर (कुस बु.), वंदना ननावरे (पाटखळ), सुनिता जाधव (करंडी), शिवाजी चव्हाण (महागाव) यांची कार्यकारिणी मध्ये निवड करण्यात आली.
सदर निवडीसाठी मनोज देवरे (सायळी) व बाबुराव गायकवाड (कोंडवे) यांनी ठराव मांडला तर विष्णू लोहार (कळंबे) व गजानन चवरे यांनी अनुमोदन दिले. या ठरावास सर्व पोलीस पाटील यांनी एकमताने मंजूर केला. सदर नवनिर्वाचित कार्यकारिणीचे सर्व पोलीस पाटील यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.