महाराष्ट्र्र न्यूज प्रतिनिधी (सोमेश्वरनगर) : विनोद गोलांडे
बारामती तालुक्यात चार दिवसांपासून अतिवृष्टी पाऊस चालू असल्याने सोमेश्वरनगर परिसरात करंजे अंतर्गत येणाऱ्या देऊळवाडी, चौधरवाडी, सोरटेवाडी, मगरवाडी तसेच करंजे करंजेपुल व परिसरात दिनांक सहा व नऊ वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्यामुळे परिसरातून पंचनामे व मदत लवकर मिळावी यासाठी शेतकरी यांनी प्रशासनाकडे जोर धरला होता व व उभे पीक भुईसपाट झाल्याची खंतही व्यक्त केली होती
त्या अनुषंगाने प्रशासकाने दिलेल्या आदेशानुसार नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची नाव नोंदणी करण्याचे काम त्वरित चालू झाले यामध्ये परिसरातील चालू हंगामातील बाजरी ,ऊस, तसेच चारा या पिकां ्चा समावेश आहे. झालेल्या अतिवृष्टी वादळी वारा व पावसामुळे शेत पिके नुकसान अंदाजे परिसरातील ऊस 50 हेक्टर ,बाजरी 50 हेक्टर व चारा पिके 10 हेक्टर नुकसान सध्या पंचनामा करता आढळून आले असून इथून पुढेही काही दिवसात काही हेक्टर क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे झालेले पंचनामे तहसील कार्यालय बारामती येथे देण्यात आले असून उर्वरित पीक पंचनामे करून तेही लवकरात लवकर शेतकऱ्यांचा दृष्टिकोनातून मदत मिळावी या अनुषंगाने तेही देण्यात येणार असल्याची माहिती कामगार तलाठी दादासाहेब आगम व कृषी सहाय्यक शरद सावंत यांनी दिली.
































