महिला सक्षमीकरणा चे सुंदर मार्गदर्शन महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
उरण ,मुंबई चेंबूर आरसीएफ येथील सुप्रसिद्ध पंचरत्न मित्र मंडळ यांच्यातर्फे दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला सक्षमीकरण व महिलांच्या आजारावर मार्गदर्शनपर कार्यक्रम गणेश मंदिर सभागृह, वाशीगांव, चेंबूर येथे आयोजित करण्यात आला होता . कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मान . श्रीमती नजहत शेख.( वित्त संचालक आरसीएफ ) मान . श्री अनिलकुमार माथूर (कार्यकारी संचालक ) . म्हणून लाभले . सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती दीपिका पाटील ,श्रीमती कविता शिकतोडे ( संचालिका जी के एस महाविद्यालय खडवली )श्री शिरीष कामत (मुख्य व्यवस्थापक ट्रॉम्बे टाटा पावर ) इत्यादी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते . मान .डॉ . विनित गायकवाड (टाटा पॉवर कंपनी ) मान . श्री अश्विन कांबळे (वरिष्ठ प्रबंधक आर सी एफ ) विशेष निमंत्रित म्हणून कार्यक्रमास हजर होते . तसेच कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक डॉ . नंदा कुमार ( स्त्री रोग तज्ञ ) श्रीमती स्नेहा नानिवडेकर (समाजसेविका ) इत्यादी कार्यक्रमास उपस्थित होते . श्रीमती रोहीणी भिसे (डायमंड लिडर, शिवशाही पैठणी ) यांनी महिलांच्या सक्षमीकरण व आजारावर उपस्थितांना सुंदर मार्गदर्शन केले . तर विशेष पाहुण्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती दीपिका पाटील यांना “नारीरत्न आयकॉन 2022 ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन स्नेहा नानिवडेकर यांनी केले . कार्यक्रमाला विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली . उपस्थित मान्यवरांचे श्री अशोक भोईर यांनी आभार व्यक्त . केले व उपस्थितांना चहा नाश्ता व सुंदर बॅग वाटप करण्यात आल्या . सदर कार्यक्रमास स्त्रियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला . सचिव प्रदीप गावंड यांच्या सहित श्री रमेश पाटील , श्री सचिन साळुंके ,श्री वैभव घरत , निलम गावंड, श्री सतीश कुंभार ,डीएम मिश्रा एम जी डिसुजा ,रूपाली नांदीवडेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले .