महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कु. राधिका हजारे यांचा पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीने, चिकाटीने अभ्यास करुन कु. राधिका हजारे यांनी ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी’ मार्फत घेतलेल्या परिक्षेत यश संपादन केले. त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली त्याबद्दल त्यांचे निखिल शिंदे सचिव महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सूरज जाधव, रोहित कांबळे, दत्तात्रय निकम.उपस्थित सहकारी यांच्या सर्वांच्या वतीने अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





















