राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील व सुशील अन्सल यांची नात अलिका किर्लोस्कर यांचा साखरपुडा उत्साहात संपन्न झाला. यावेळी पाटील आणि किर्लोस्कर कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.अलिका किर्लोस्कर ही उद्योगपती राहुल किर्लोस्कर यांची मुलगी आहे . राहुल किर्लोस्कर हे एस. एल किर्लोस्कर यांचे सर्वात धाकटे नातु आहेत. राहुल किर्लोस्कर यांची किर्लोस्कर न्यूमेटिक कंपनी लिमिटेड (केपीसीएल) चे एमडी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आणि २००९ मध्ये त्यांनी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. तिची आई अल्पना किर्लोस्कर ही सुशील अन्सल यांची मुलगी आहे. ज्यांना उपहार सिनेमा आगीत अटक करण्यात आली होती. जिथे शेकडो लोकांचा जीव गेला होता. अलिका किर्लोस्कर ही लक्ष्मण किर्लोस्करांची पाचवी पिढी आहे. तिचे वडील राहुल किर्लोस्कर हे किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेडचे मालक आहेत आणि काका अतुल किर्लोस्कर किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडचे मालक आहेत आणि दुसरे काका संजय किर्लोस्कर यांचे मालकीचे किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड – केबीएल किर्लोस्करवाडी येथे कारखाना असून गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रकरणांवरून न्यायालयीन लढाईत आहेत. प्रतिक पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व असून ते इस्लामपूरमधून पक्षीय राजकारणात सक्रियपणे सहभागी असतात.तर अलिका किर्लोस्कर आपल्या वडिलांची कंपनी किर्लोस्कर चिलर्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.