महाराष्ट्र न्यूज लोणंद प्रतिनिधी :
सातारा जिल्ह्यातील राज्य महामार्ग 117 चे राष्ट्रीय महामार्ग कडे वर्ग झाले बाबत माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे वतीने समजली, सदर राज्य महामार्ग 117 लोणंद ते सातारा हा आपल्या राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे या रस्त्यावर खर्च टाकता येत नाही असं म्हणनं आहे.
या मार्गावरील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असुन लोणंद ते सातारा प्रवास करणे अतिशय त्रासदायक व धोकादायक झाले आहे, अनेक खड्डे पडलेने खड्डे चुकविताना अपघात घडत असुन यामाध्यमातून अनेकांना आपला जिव गमवावा लागला आहे व लागत आहे. ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, गरोदर व अपंग यांसाठी तर हा रस्ता मृत्यूच्या दारात घेऊन जाणारा रस्ता झाला आहे.
या रस्त्यावरील समस्यांबाबत गांभीर्याने दखल घेऊन सदर रस्ता हा सुस्थितीत आणणे गरजेचे आहे. या मार्गावरील खड्डे योग्य रितीने नियोजन करुन तातडीने मुजविन्यात यावेत तसेच हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या क्षमतेने दर्जेदारपणे उभारणी करावी व नागरीक व वाहनधारकांना दिलासा द्यावा अन्यथा आम्हाला जन आंदोलन उभारावे लागेल असा इशारा महाप्रबंधक (तकनीकी) एवंम परियोजना निदेशक माननीय सुहास चिटणीस साहेब व सहायक व्यवस्थापक माननीय अनील गोरड साहेब तथा मा.प्रकल्प संचालक सो.भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (सडक व महामार्ग परिवाहन मंत्रालय, भारत सरकार) प्रोजेक्ट इंप्लेमेनेशन युनिट, पुणे यांना निवेदनाद्वारे साथ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष कय्युम मुल्ला व शिवसेना खंडाळा उप तालुका प्रमुख संतोष मुसळे यांनी दिला.