आमदार निधीत एक कोटींची घसघशीत वाढ,
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क दिनांक 17 मार्च
राज्यातील आमदारांच्या निधीत एक कोटीची घसघशीत वाढ करण्यात आला आमदारांच्या ड्रायव्हरचा पगार 15 हजार रुपयावरुन 20 हजार रुपये करण्यात आला आहे. तर आमदारांच्या पीएचा पगार 25 हजारावरुन 30 हजार करण्यांत आला.
आहे. आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी रुपयांवरून पाच कोटी रुपये करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची घोषणा केली. तर आमदारांचे वाहन चालक आणि स्वीय सचिव यांच्या वेतनात पाच हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आमदारांच्या ड्रायव्हरचा पगार 15 हजार रुपयावरुन 20 हजार रुपये करण्यात आला आहे. तर आमदारांच्या पीएचा पगार 25 हजारावरुन 30 हजार करण्यांत आला.
. विधानसभा आणि विधानपरिषदेतील आमदारांना हा निधी मिळणार आहे. विधानसभेतील आमदारांची संख्या 288 तर विधानपरिषदेचे 78 आमदार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आमदारांच्या निधीमध्ये दोन वर्ष वाढ केली नव्हती. त्यानंतर आज दोन वर्षानंतर आमदार निधीमध्ये एक कोटीची वाढ करण्यात आली आहे.