महाराष्ट्र न्यूज वडगाव निंबाळकर प्रतिनिधी संतोष भोसले
बहुजन हक्क परिषद संघटनेच्या बारामती तालुका युवक अध्यक्षपदी वडगाव निंबाळकर ता.बारामती येथील अमोल विलास गायकवाड यांची निवड झाली आहे.नुकत्याच होळ ता.बारामती येथे संघटनेच्या झालेल्या बैठकीत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल धिवार यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे महाराष्ट्र युवक अध्यक्ष नानासाहेब मदने, कैलास धिवार, बबन भंडलकर, हनुमंत भंडलकर, नामदेव भिसे, विजय वाघमारे, ऋषिकेश खोमणे आदी उपस्थित होते. समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन संघटनेने ही जबाबदारी दिली असून आगामी काळात तालुक्यातील प्रत्येक गावात संघटनेची शाखा स्थापन करणार असल्याचे गायकवाड यांनी निवडीनंतर सांगितले.
































