छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेस ७.२६ कोटींचा नफा संस्थापक- रामभाऊ लेंभे
पिंपोडे बु।।-प्रतिनिधी
ग्रामीण भागात स्थापन होऊन मुंबई , नवी मुंबई , पुणे , कोल्हापूर , सातारा , बारामतीसह विविध शहरांकडे झेप घेऊन सक्षम झालेल्या पिंपोडे बुद्रुक , ता . कोरेगाव येथील छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेचा संमिश्र व्यवसाय ८५८ कोटी ८२ लाख रूपये झाला असून , गत आर्थिक वर्षात संस्थेस ७ कोटी २६ लाखांचा ढोबळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी पत्रकार परिषदेत दिली . ग्राहकांना मोबाईल बँकिंग सेवा देणाऱ्या आयएसओ मानांकित छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेचागतिमान कारभार ८ विभागीय कार्यालयांचे माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात ५२ शाखांमधून सुरु असून , १०० कोटींचा सुरक्षित सोनेतारण कर्जव्यवहार , सक्षम बँकेप्रमाणे सीबीएस प्रणालीद्वारे आरटीजीएस , एनईएफटी , आयएमपीएस सुविधा देण्यात आहेत . ३१ मार्च २०२२ अखेर संस्थेकडे ठेवी ५०२ कोटी ३८ लाख , येणे कर्ज ३५६ कोटी ५४ लाख , भागभांडवल २५ कोटी ३४लाख , सभासद संख्या ६२१५४ , गुंतवणूक १४६ कोटी ६३ लाख , खेळते भांडवल ५७१ कोटी ९ लाख अशी भक्कम आर्थिक स्थिती आहे . लवकरच संस्था १ हजार कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा पार करेल . यावेळी संस्थेचे चेअरमन डॉ . सोपानराव चव्हाण , व्हाईस चेअरमन श्रीकांत शेटे , संचालक मंडळ , मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक रा . लेंभे उपस्थित होते .