पिंपोडे बु।।- प्रतिनिधी उन्हाची तीव्रता लक्षात घेता प्राथमिक शाळांची वेळ कमी करावी अशी मागणी सातारा जिल्हा शिक्षक समितीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी सातारा श्री मनोज जाधव साहेब व प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीम.मुजावर मॅडम यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली.याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. सातारा जिल्हा शिक्षक समितीच्या वतीने शिक्षकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांविषयी चर्चा करून मार्ग काढण्यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथ) व मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा यांना लेखी निवेदन देऊन शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.यावेळी शाळेची वेळ कमी करावी, वाई आणि कोरेगाव तालुक्याचे फेब्रुवारी चे पगार लवकर करावेत, सुगम दुर्गम शाळेच्या बाबतीत अवघड शाळांची यादी 4 ऐवजी 3 निकषावर पुन्हा प्रसिद्ध करावी, सेवानिवृत्त शिक्षकांची पेन्शन महिन्याच्या एक तारखेला मिळावी, निवड श्रेणी, वरिष्ट श्रेणी प्रस्ताव मागवावेत, यासह अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

अवघड शाळांची यादी 4 ऐवजी 3 निकषानुसार करण्यासाठीही उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दाखवला आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे, सरचिटणीस व बँकेचे संचालक किरण यादव, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन विठ्ठल माने,संचालक शिवाजी शिंदे,सुभाष शेवाळे, चंद्रकांत मोरे जिल्हा कार्यकारणी सदस्य सुरेंद्र घाडगे ,मोहन सातपुते ,अनिल पिसाळ, एम डी दडस,अनिल डोईफोडे, गजानन वारागडे,चंद्रकांत कांबळे बाळकृष्ण कुंभार तसेच विविध तालुक्यांचे अध्यक्ष अनिल चव्हाण, नितीन शिर्के, भगवंतराव कदम, तानाजी यादव,अर्जुन यमगर, सुरेश चिकणे, अरुण पाटील, राजेंद्र कदम यासह नारायण शिंदे,गणेश तांबे, महादेव क्षीरसागर, रणजीत गुरव, संजय नांगरे, श्रीकांत दोरगे, उदय घोरपडे, दीपक रणपिसे,अंकुश नांगरे,यासह अनेक आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.






























