इनरव्हील क्लब लोणंद चे अध्यक्ष सौ. शिल्पा अमोल पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांनी समाजातील महिलांचा सन्मान करण्याचा मानस केला होता. त्या प्रमाणे सौ. शिल्पा पवार यांनी लोणंद मधील सर्व अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस यांना पेन आणि गुलाबपुष्प दिले तसेच अंगणवाडी मधील सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक शालेय किट देऊन बालकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून अध्यक्ष सौ शिल्पा पवार यांनी इतर खर्चाना बगल देत समाजातील घटकांच्या बरोबर वाढदिवस साजरा करण्यात खूप आनंद आहे असे म्हाणाल्या. तसेच प्राथमिक शिक्षिका यांचा ही सन्मान करण्यात आला. कोरोना काळात आरोग्य खात्यास मदत करणाऱ्या लोणंद मधील आशाताई (आशा) यांना त्यांच्या कामात उपयोग अशी बॅग (पर्स) देऊन सन्मान केला.तसेच समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरणारे पत्रकार बांधवानचा पेन आणि गुलाबपुष्प देऊन त्यांची कृतज्ञता व्यक्त केली.
सौ शिल्पा पवार यांनी आपल्या मनोगतात या पुढे कुटुंबातील सर्व सदस्यांचे वाढदिवस लोकहिताचा विचार करून करण्याचा विचार व्यक्त केला. त्या बोलताना लोणंद मधील प्राथमिक शाळा यांना मदत करण्यासाठी आग्रही राहू अशी ग्याही दिली. यावेळी सचिव शिल्पा शहा, ममता आरोरा, दिपाली क्षिरसागर, ममता बोरकर, सन्मती शहा, जयश्री यादव, मनीषा काकडे,चैत्राली सूर्यवंशी, स्वाती गांधी तसेच इनरव्हील क्लबचे सर्व मेंबर उपस्थित होते. वाढदिवसाचा सर्व खर्च सौ. शिल्पा पवार यांनी स्वतः केला असण्याने क्लब मधील सर्व मेंबर्स नी शिल्पा पवार यांचे खूप कौतुक केले व वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या सर्वांचे आभार त्यांनी मानले.
































