पार्ले–बनवडी सोसायटीच्या चेअरमनपदी विकास पाटील आणि व्हाईस चेअरमनपदी मंदाकिनी नलवडे यांची बिनविरोध निवड
नामदार बाळासाहेब पाटील यांनी केले अभिनंदन.
पार्ले-बनवडी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी विकास विनायक पाटील आणि व्हाईस चेअरमनपदी श्रीमती मंदाकिनी प्रकाश नलवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
बिनविरोध निवड झालेल्या नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सदस्य आणि प्रमुख कार्यकर्ते सर्वश्री अशोकराव पाटील (भाऊ), प्रकाश पाटील, तानाजी नलवडे, संपतराव नलवडे, शंकरराव खापे (बापू) यांनी राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली, यावेळी नामदार बाळासाहेब पाटील यांनी नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी भगवान पाटील, दिनकर नलवडे, अर्जुन नलवडे, रघुनाथ नलवडे, बाळासो नलवडे, सुनील नलवडे, राजेंद्र नलवडे, संभाजी नलवडे, सोमनाथ नलवडे, विजय पाटील, नागेश मिसाळ, शिवाजी नलवडे, प्रवीण पाटील, निलेश नलवडे, अमित पाटील यांचेसह संस्थेचे सभासद- ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन करताना मा.ना.बाळासाहेब पाटील समवेत अशोकराव पाटील, शंकरराव खापे व सभासद ग्रामस्थ






























