साखरवाडी प्रतिनिधी दिनांक गुरुवार २८/४/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता साखरवाडी विद्यालय प्राथमिक विभाग पेट्रोल पंपा शेजारी साखरवाडी तालुका फलटण येथे भव्य अश्व नृत्य स्पर्धा भैरवनाथ यात्रा समिती महोत्सव पिंपळवाडी साखरवाडी यांच्या वतीने घेण्यात येणार आहेत या स्पर्धेसाठी विविध ठिकाणाहून हौशी आपले अश्व घेऊन सहभागी होणार आहेत या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस १५००१ रुपये व चांदीची गदा भैरवनाथ यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात येणार आहे द्वतीय क्रमांकासाठी १११११ व आकर्षक ट्रॉफी सचिन पवार यांच्यातर्फे तर तृतीय क्रमांकासाठी ७७७७ रुपये व ट्रॉफी पैलवान ओंकार विलास भोसले यांच्या वतीने देण्यात येणार आहे चतुर्थ क्रमांकासाठी ५५५५ रुपये व ट्रॉफी उपसरपंच साखरवाडी अक्षय किरण रुपनवर यांचे असून पंचम क्रमांकासाठी ३३३३ रुपये व ट्रॉफी पहिला मानाचा गणपती बाजारपेठ साखरवाडी सहावा क्रमांक साठी रुपये २२२२ पैलवान विजय रामदास गोफणे उपसरपंच चौधरवाडी तालुका फलटण यांनी जाहीर केले आहे सर्वोत्कृष्ट नाचकाम व उत्कृष्ट संगोपन व सुदृढ घोड्यासाठी १००१ रुपये अमोल झेंडे यांच्या वतीने तर सर्वोत्कृष्ट हलगी वादक का साठी १००१ मानाची ढाल शुभम आडागळे यांच्यातर्फे देण्यात येणार आहे हा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी अश्व मालक व साखरवाडी पिंपळवाडी परिसरातील अश्व एकता कमिटीचे सनी थोरात, ज्ञानेश्वर भोसले, शाहरुख पठाण, शंकर खोमणे, आप्पा शिंदे यांचे सहकार्य लाभणार आहे श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितीन भोसले व डॉक्टर आनंद जाधव महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र साखरवाडी चे उमेश पवार यांचेही या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभणार असून यासाठी परिसरातील विविध तरुण मंडळांनी ही या अश्व नृत्य कार्यक्रमासाठी आपले सहकार्य दिले आहे असे या अश्व नृत्य महोत्सव समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे