धर्मवीर चित्रपट सर्वांनी पहावा असाच.: काकासाहेब जाधव
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : हिंदूर्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट व निष्ठावान शिवसैनिक तात्कालिन ठाणे जिल्हाप्रमुख स्व. आंनद दिघे यांच्यावर १३ में रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा पहिला दिवस पहिला खेळ कराड येथील प्रभात चित्र मंदिरात प्रदर्शित करण्यात आला. तत्पूर्वी शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमेला दुग्धअभिषेक घालून अभिवादन केले व पडदा पूजन केले. यावेळी शिवसैनिक व कराड वासीयांनी चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी बोलताना शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख काकासाहेब जाधव यांनी सांगितले की *”धर्मवीर – मुक्काम पोस्ट – ठाणे”* हा चित्रपट आनंद दिघेसाहेब समजण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने पाहावा.
त्यांनी समाजाप्रती केलेली कामे , अन्याय ग्रस्तांना दिलेला न्याय व बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी असलेली निष्ठा हे पाहून प्रत्येक शिवसैनिकांला नक्कीच उर्जा मिळेल. तसेच मुंबईमध्ये शिवसेनाच का पाहिजे या प्रश्नाचे उत्तरही हा चित्रपट पाहिल्यानंतर सर्वांना नक्की मिळेल. यासाठीच प्रत्येक व्यक्तीने हा चित्रपट पहावा असे आव्हानही काकासाहेब जाधव यांनी केले. _यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख काकासाहेब जाधव ,शंकर विर ,शहर प्रमुख शशिराज करपे , उप शहरप्रमुख अक्षय गवळी, विभागप्रमुख प्रविण लोहार , किरण चवरे , राजेंद्र पाटील,निलेश पारखे , ग्राहक सेनेचे राजेंद्र माने , वाहतूक सेनेचे ज्ञानदेव भोसले, शिवसामर्थ्य सेनेचे प्रमोद वेर्णेकर , दशरथ धोत्रे , सौरभ कुलकर्णी , रूग्वेद चवरे आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.