संतोष भोसले
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी ,वडगाव निंबाळकर
चोपडज ता. बारामती येथिल माळीवस्ती परिसरातील ओढ्यावर बंधारा बांधकामास सुरूवात करण्यात आली आहे. खासदार शरचंद्रजी पवार यांच्या फंडातून १५ लाख रूपयांचा निधी यासाठी मिळाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून बंधाऱ्याच्या कामासाठी निधी मिळावा अशी मागणी करण्यात येत होती यावेळी निधी मंजूर झाला पण लॉकडाऊन मुळे काम करता आले नाही. नुकतेच कामाला सुरुवात करण्यात आली. वाकी तलावाच्या सांडव्यावरील ओढ्यावर तीन ठिकाणी बंधारे बांधले आहेत. यामुळे ओढा पात्रात पाणी साठुन परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होत आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेउन गावातील दुसऱ्या बंधाऱ्याला पवार साहेबांनी निधी दिला आहे. कामाचा शुभारंभ प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, बारामती पंचायत समितीचे सभापती निता बारवकर, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर, बारामती पंचायत समिती उपसभापती प्रदीप धापटे, निरा मार्केट कमिटी सभापती मुरलीधर ठोंबरे, पंचायत समिती सदस्य राहुल भापकर, नीरा मार्केट माजी सभापती संजय गाडेकर, सरपंच अश्विनी समीर गाडेकर, उपसरपंच सुनिता वत्रे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गाडेकर, देविदास गाडेकर, रूपाली भोसले, भूप साहेब, आप्पा कोकरे, भानुदास साळुंखे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.