शिवतेज जाधव याचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
इंदापूर तालुक्यातील कळंब येथील प्रभाग ४ मधील शिवतेज दत्तात्रय जाधव याचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने व कोरोना संबंधी जनजागृती करीत साजरा करण्यात आला . यासमयी डाॅ. किसन पवार यांनी ह्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले , सामाजिक संस्था व युवकांनी कोरोनाबद्दल जनजागृती करणेसाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगितले .
कळंब येथील आशा नर्सिंग होम हाॅस्पिटल येथे कोरोना बद्दल जनजागृती व मार्गदर्शन करीत, युवकांनी सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले . फोन वरून युवा नेते राजवर्धन पाटील यांनी शिवतेज यास वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.






















