बिदाल प्रतिनिधी
टाकेवाडी येथील सहकारी सेवा सोसायटी वर आमदार जयकुमार गटाच्या पॅनेलची सत्ता आली आहे. विरोधी पॅनेलचा पराभव करून १२/१ संचालक विजयी झाले आहेत.
यामध्ये जालिंदर दडस, दिलीप दडस दत्तात्रेय सस्ते, रामदास दडस, शामराव घोरपडे, धनाजी दडस, महादेव दडस, बबन ठोंबरे, बिरा दडस यांच्या नेतृत्वाखाली आमदार जयकुमार गटाची सत्ता व पॅनेल विजयी झाला आहे.
त्यामध्ये संचालक म्हणून सौ सुलोचना रामचंद्र ठोंबरे, सौ मंगल मोहन दडस, दादा आप्पाजी दडस, शंकर प्रभु घोरपडे,दत्तू केरु दडस, दादा बाबा दडस, नामदेव तात्याबा दडस, शंकर एकनाथ दडस, गुलाब सखाराम दडस, दादा बाबा दडस,मारुती माने, बबन ताटे हे संचालक म्हणून निवडून आलेले आहेत.यावेळी अर्जुन काळे बळवंत पाटील,जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, बाळासाहेब कदम, किसनराव सस्ते या सर्व मान्यवरांनी नवीन संचालकांचे अभिनंदन केले.
फोटो ओळीटाकेवाडी (ता माण ) येथे मिरवणूक मध्ये आनंद साजरा करताना कार्यकर्ते (छायाचित्र आकाश दडस)