संदीप आवटे यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणात उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे यांनी माफी मागण्याची मागणी
दहिवडी : ता.२१
दहिवडी नगरपंचायतीचे कर्मचारी संदीप मोहन आवटे यांना उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे यांनी अपमानास्पद शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याप्रकरणी दहिवडी नगरपंचायतीचे कर्मचारी आक्रमक झाले असून याबाबत त्यांनी मुख्याधिकारी कपिल जगताप यांना निवेदन लिहिले आहे.
त्यांनी लिहिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, संदीप मोहन आवटे या कर्मचाऱ्यावर उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे यांनी तुपेवाडी येथे नगरपंचायतीची विद्युत लाईन नसताना चुकीच्या पद्धतीने बल्ब लावण्यास सांगितले. यादरम्यान त्यांनी सदर कर्मचाऱ्यास अपमानास्पद शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. हा प्रकार निंदनीय आहे. बरोबर असे प्रकार वारंवार घडत असून नगरसेवक आणि नगरसेविकांचे पती यांच्याकडून कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे. ओळख कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. आम्ही अनधिकृत काम करण्यास नकार दिल्यास आम्हाला कामावरून घरी घालवण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे मी तणावात असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.
आम्हा सर्व गरीब कर्मचाऱ्यांचे आपण मायबाप आहात. या झालेल्या प्रकारात आम्हाला न्याय मिळावा. तसेच संदीप मोहन आवटे यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे यांनी दोन दिवसात लेखी मागावी. उपनगराध्यक्षांचा लेखी माफीनामा न मिळाल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीही कर्मचाऱ्यांनी लिहिलेल्या निवेदनात केली आहे.