कोरोना बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे फलटण नगर परिषदेचे कार्यकारी अधिकारी प्रसाद काटकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती, फलटण यांच्या वतीने सहा बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीने प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप व नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्याकडे हे बेड सुपूर्त केले आहेत.
यावेळी समितीचे मधुकर काकडे, नगरसेवक सचिन अहिवळे , अध्यक्ष सुधीर अहिवळे , माजी अध्यक्ष श्याम अहिवळे , संजय गायकवाड तसेच यंदाचे जयंतीचे समिती प्रमुख देवेंद्रराज कांबळे यांच्यासह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. वैद्यकीय साहित्याचा तुटवडा जाणवत आहे. तसेच आरोग्य विभाग आणि इतर कर्मचारी त्यांच्यावरील कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे नियम पाळा आणि सावध होऊन प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीने शहर वासियांना काढण्यात आले आहे.