चेअरमननी वार्षिक सभेतून काढला पळ शिक्षक समितीचा आरोप
प्रतिसभेत सत्ताधाऱ्यावर शिक्षक समितीने डागली तोफ
पिंपोडे बु।।-प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेत शिक्षक समितीच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे चेअरमननी अवघ्या दहा मिनिटात सभा गुंडाळल्याचा आरोप शिक्षक समितीकडून करण्यात आला . बँकेतील भ्रष्टाचार , चेअरमन यांचे अनियमित कर्ज बोगस कर्ज प्रकरण असे अनेक मुद्दे शिक्षक समितीने लावून धरल्याने प्रश्नांची उत्तरे देऊ न शकल्याने सत्ताधाऱ्यांनी सभा गुंडाळल्याचा आरोप शिक्षक समितीने प्रतिसभेत केला . बँकेची ७५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोरया लॉन येथे झाली . समितीच्या आक्रमक धोरणामुळे सत्ताधाऱ्यांना गोंधळातच सभा संपवावी लागली . सत्ताधारी चेअरमन व त्यांच्या संचालकांचा निषेध करून जिल्हा शिक्षक समितीने प्रतिसभा घेतली . बँकेतील भ्रष्ट प्रवृत्ती बाजूला सारून बैंक बवर्गात जाण्यापासून रोखण्यासाठी शिक्षक समितीला हे शिवधनुष्य हाती घ्यावे लागेल , असे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी सांगितले . शिक्षक समितीच्या विचारांशी जिल्ह्यातील सभासद एकरूप झाल्याने परिवर्तन होणारच आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . गेल्या सात वर्षांतील भ्रष्ट कारभाराचे अनेक दाखले पुराव्यासहित शिक्षकबँकेचे संचालक किरण यादव , शिवाजी शिंदे , सुभाष शेवाळे , चंद्रकांत मोरे यांनी प्रतिसभेत दिले . विश्वंभर रणनवरे यांनी भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे वार्षिक सभेत विचारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले .

परिवर्तनासाठी सज्ज राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्षांनी केले . यावेळी माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव देवरे , माजीचेअरमन विश्वास चव्हाण , विठ्ठल माने , प्रदीप कदम , विठ्ठल फडतरे , सतीश नलवडे , संजय नांगरे , उदय नाळे , जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुरेंद्रकुमार घाडगे , गजानन • वारागडे , अनिल पिसाळ , मोहनराव सातपुते बाळकृष्ण कुंभार , संतोष घोडके , एम . डी . दडस , डी . डी ढेबे , चंद्रकांत कांबळे , अनिल डोईफोडे , विविध तालुक्यांचे अध्यक्ष अनिल चव्हाण , अरुण पाटील , सुरेश चिकणे , भगवंतराव कदम , नितीन शिर्के , अर्जुन यमगर विनायक चव्हाण , तानाजी यादव , भाऊसाहेब दानवले , राजेंद्र कदम यासह शशिकांत बागल , नेताजी जगताप , किसन खताळ , तानाजी वाघमोडे , अंकुश नांगरे , धीरेश गोळे , संतोष शिंदे यांच्यासह शिक्षक समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते .






















