महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील ( चेअरमन , कर्मयोगी सहकारी साखर कारखाना, बिजवडी ) आणि पद्माताई भोसले ( व्हॉइस चेअरमन कर्मयोगी सहकारी साखर कारखाना, बिजवडी ) तसेच संचालक मंडळ व प्रगतशील बागायतदार यांच्या शुभहस्ते दि. ११ ऑक्टोबर २०२० रोजी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना मर्या. बिजवडीच्या ३१ व्या गळीत हंगामाची मोळी पुजनाने सुरुवात झाली .
यावेळी काटा पूजन करून , ऊस भरून आलेल्या वाहनांचे पूजन करून , उस गव्हाणीत टाकण्यात आला . चालू हंगामात ऊस टनेज मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे . यंदा उसाचे क्षेत्र जास्त असल्याने सर्व भागातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी आणला जाणार आहे . यावर्षी कर्मयोगी कारखान्याचे १४ लाख मे . टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे .
































