पाटण तालुका पत्रकार संघाकडून गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.
पाटण :- पाटण तालुक्यातील निसर्गरम्य डोंगर दुर्गम परिसरात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारवट येथील गरीबातील गरीब विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीतून पाटण तालुका पत्रकार संघाच्या वतीने संपूर्ण शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मितहास्य दिसून आले. या उपक्रमाबद्दल कारवट गावचे सरपंच सौ. अश्विनी सोनावले, मुख्याध्यापक- तडवी सर, फ्रेंडस ग्रुपचे अध्यक्ष राजेश शिंदे ग्रामस्थ, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष कविता शिंदे, शिक्षक, विद्यार्थी यांनी पत्रकार संघाचे कौतुक केले. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या पाटण तालुका पत्रकार संघ नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतो. समाजाचे प्रश्न लेखनीतून मांडत असताना केवळ लेखनीतून समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत या उध्दात हेतूने सामाजिक कार्यात उतरून रक्तदान, मोफत आरोग्य शिबीर, अपदग्रस्तांना मदत, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमात उतरून निसर्ग व पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण,निसर्ग व गडकिल्ल्यांचे संवर्धन, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्पर्धात्मक परिक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम असे उपक्रम राबवित असतो. पत्रकार संघाच्या या कार्याची दखल घेत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने महाराष्ट्र राज्यातील पहिल्या उत्कृष्ट आदर्श पत्रकार संघ पुरस्कारासाठी पाटण तालुका पत्रकार संघाची निवड करून १८ जून २०१८ रोजी पत्रकार संघाबरोबर पाटण तालुक्याचा गौरव केला होता. या पुरस्काराच्या आठवणीत पाटण तालुक्यातील निसर्गरम्य डोंगर दुर्गम परिसरातील गरीब विदयार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक साहित्याचे वाटप केले असल्याचे पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंदराव देसाई यांनी सांगितले.

यावेळी फ्रेंडस ग्रुपचे अध्यक्ष राजेश शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक- तडवी सर, पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष शंकर मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास पत्रकार संघाचे सचिव भगवंत लोहार, उपाध्यक्ष संजय कांबळे, उपाध्यक्ष जयभीम कांबळे, माजी अध्यक्ष विलासराव माने, विक्रांत कांबळे, योगेश हिरवे, नितीन खैरमोडे, कृष्णत सांळुखे, दादासो पवार, श्रीगणेश गायकवाड, के.डी.चव्हाण, सिताराम पवार, नितीन सत्रे यासंह ग्रामस्थ रमेश शिंदे, सविता शिंदे, भारती शिंदे, तुकाराम शिंदे, दत्ताराम शिंदे, भागुजी शिंदे, धोंडीराम शिंदे, विकास शिंदे, सुशिला सावंत, संगिता शिंदे, आशा शिंदे, अंजना शिंदे, सुनिता शिंदे, विमल शिंदे यासह ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















