वाठार किरोली ता. कोरेगाव येथील सोमवार दि. ३० नोव्हेंबर व मंगळवार दि. १ रोजी होणारी यात्रा सध्या सुरू असलेल्या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याची माहिती अंबामाता देवीचे प्रमुख मानकरी आणि यात्रा कमिटीने दिली. जिल्ह्यासह कोरेगाव तालुक्यातील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरवर्षी अंबामाता रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, परंतु यावर्षी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी अंबामाता देवीचे धार्मिक विधी आणि दर्शन सकाळी ९ ते ५ यावेळेत सोशल डिस्टशन पाळून व मास्क कंपल्सरी वापरून तसेच सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर ठेवून घेता येणार आहे. तसेच इतर कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत असे प्रमुख मानकरी , ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीने कळविले आहे. यावर्षी कोरोनाच्या कारणामुळे यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रशासनाने दिलेल्या नियमांचे ग्रामस्थांनी पालन करावे असे आवाहन यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले.