शेतकरी बंधूसाठी I.C.L. ऊस प्रात्यक्षिक पाहणी व ऊस पीक परिसंवादाचे आयोजन
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी: इस्रायल केमिकल्स लिमिटेड तर्फे “ऊस प्रात्यक्षिक पाहणी व ऊस पिक परिसंवाद”कार्यक्रम करवडी ता. कराड येथे शिवमंदार सभागृहात शेतकरी बंधूंसाठी आयोजित करण्यात आला. “शाश्वत भविष्याकडे दमदार वाटचाल” या आपल्या घोषवाक्य नुसार आय.सी.एल. इस्रायल केमिकल लिमिटेड ही जगविख्यात खते उत्पादन करणारी इस्रायल स्थित बहुराष्ट्रीय कंपनी आहे.आय सी.एल.उच्च दर्जाची विद्राव्य खते निर्माण करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. फर्टीगेशन व ठिबक सिंचन अशा प्रगत व अत्याधुनिक तंत्राचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना मोलाचा व तांत्रिक सल्ला देण्याचे काम करत असते.
पश्चिम महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात उसाचे पीक घेण्याचे प्रमाण खूप आहे. उसाचे क्षेत्र ही खूप आहे.परंतु पारंपारिक पद्धतीने ऊस पिक घेतल्यामुळे उत्पन्नात वाढ दिसून आलेली नाही.यामुळे शेतकरी हवालदिल होतो.आणि उत्पन्न कमी झाल्यामुळे मानसिक तणावाखाली जातो. यासाठी आय.सी.एल. व ऍग्रो हायटेक मार्फत बऱ्याचशा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून उच्च उत्पादन कसे घेता येईल याकडे लक्ष वेधले जाते.यासाठी खूप सारे प्रयत्न देखील केले जात आहेत.आजवर काही जिल्ह्यांपुरतीच मर्यादित काम करणारे ऍग्रो हायटेक व आय.सी.एल कोरेगाव या भागात त्यांचे जाळे होते. मात्र आता ॲग्रो हायटेक कराड या नव्या शाखेमार्फत कराड भागातील ऊस पीकाबाबत काम करत आहेत.आणि त्याचाच परिपाक म्हणून येथील आधुनिक शेतकरी सुनिल पवार यांनी लाईव्ह प्रात्यक्षिक प्लॉट तयार केलाय.लागण 125 टन गेलेलीच आहे,खोडवा ही 125 टनाचे उद्दिष्ट पकडले आहे. आणि तेच प्रात्यक्षिक पाहण्यासाठी ऍग्रो हायटेक समूह आय.सी.एल कंपनी यांच्यामार्फत ह्या ऊस प्रात्यक्षिक पाहणी व ऊस पिक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.

त्यामुळे कराड व कराड ग्रामीण भागातील सर्व शेतकरी बंधूंना याचा फायदा होणार हे नक्की. या आय.सी.एल. ऊस प्रात्यक्षिक पाहणी व ऊस पीक परिसंवादाला शेकडो शेतकरी बंधूंची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख उपस्थिती होती ती, राकेश पाटील,स्टेट मॅनेजर आय.सी.एल. इंडिया.संजय बिरादार, सीनियर अग्रोनोमिस्ट इंडिया. राहुल कोळगे,सेल्स एक्झिक्युटिव्ह आय.सी.एल. इंडिया. तसेच निमंत्रक अनिल ढोले,ॲग्रो हायटेक कुटुंबप्रमुख. संदीप महामुलकर,रिजनल मॅनेजर, सांगली ऍग्रो हायटेक इंडिया व समस्त ऍग्रो हायटेक परिवारा चे सर्व उपस्थित होते.






















