महाराष्ट्र न्युज फलटण प्रतिनिधी
फलटण शहरात आज २/५/२०२१ पासून उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी कंटेन्मेंट झोन जाहीर केला असून आज पोलिसांनी याची कडक अंमलबजावणी सुरू केली असून यामध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्या व्यक्तींची चौकशी करून एकूण ४० वाहने ताब्यात घेतली असून फलटण पोलिसांकडून शहरातील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात आले आहे की फलटण शहरामध्ये कोरोना रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप फलटण यांनी दिनांक २/५/२१ ते दिनांक ८/५/२१ रोजी पर्यंत फलटण शहर व शहराचे आसपासचा परिसर हा कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केलेला आहे. सदर अनुषंगाने फलटण शहर पोलीस ठाण्याचे वतीने आज दिनांक २/५/२१ रोजी हद्दीमध्ये नाकाबंदी नेमून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या व्यक्तींची चौकशी करून विनाकारण फिरणारी एकूण४० वाहने डिटेन केली आहेत.डिटेन केलेली वाहने वाहन मालकांना आठ दिवसानंतर ताब्यात देण्यात येणार आहेत. तरी अत्यावश्यक सेवा वगळता कोणीही नागरिक विनाकारण फलटण शहरात फिरू नये असे आव्हान फलटण शहर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे.






















