फलटण प्रतिनिधी : साखरवाडी मध्ये असणाऱ्या दि एम्रल्ड हाईट्स इंटरनॅशनल शाळेमध्ये दिनांक.११/७/२०२२ रोजी महाराष्ट्रीयन बेंदूर उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली शिंदे मॅडम उपस्थित होती. सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापिका शिंदे मॅडम यांनी बैलांचे पूजन करून मुलांना महाराष्ट्रीयन बेंदूर या सणाची माहिती दिली. बेंदूर सणानिमित्त मुले शेतकरी व मुली शेतकरीन या वेशभूषा तयार होऊन आले होते. मुलांनी घरून सुंदर अशी मंदिरे, घरे, विहिरी, बैलगाडी, बैल जोडी, अशा विविध प्रकारच्या वस्तू कार्डशिट पेपरच्या बनवून आणल्या होत्या. शाळेच्या शिक्षकांनी ते सर्व साहित्य एकत्र करून त्याचे एक गाव बनवले होते. त्या गावांमध्ये असणाऱ्या सर्व गोष्टींची माहिती मुलांना देण्यात आली. शेतकरी बैलांना घेऊन शेतामध्ये कसा राबवतो. हे ही मुलांना सांगण्यात आले. यानंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. अशा प्रकारे महाराष्ट्रीयन बेंदूर साजरा करण्यात आला.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली दत्तात्रय शिंदे मॅडम शाळेच्या इन्चार्ज शितल कुंभार , सविता जगताप, संध्या जगताप, स्नेहल पवार, सुषमा गायकवाड उपस्थित होत्या.






















