महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : गणेश पवार
रामोशी बेरड या जमातीचा अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समावेश करण्यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करावी व इतर मागण्यांबाबत जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा यांच्यावतीने बारामतीच्या नायब तहसीलदार धनंजय जाधव यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र मधील बेरड रामोशी समाजाला भारतीय राज्य घटनेने कलम ३४१ व ३४२ नुसार घटनात्मक हक्क व अधिकार प्राप्त झाले असून सुद्धा गेले अनेक वर्ष याच्या अंमलबजावणी झाली नाही अनुसूचित जाती जमाती सुधारित कायदा १९७६ अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यामध्ये होत नाही.
तरी या प्रश्नी केंद्राने त्वरित कार्यवाही करून अमंलबजावणी करावी अशी मागणी नायब तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी नानासाहेब मदने अध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा, सागर खोमणे बारामती तालुका अध्यक्ष, महेश दादा जाधव उपाध्यक्ष, कालिदास उर्फ खोमणे सदस्य इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मागील पाच वर्षांपासून रामोशी-बेरड समाजात न्याय हक्कासाठी दौलत नाना शितोळे संस्थापक अध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत वारंवार मागणी करूनही आम्हाला न्याय मिळत नाही तरी 20 दिवसाच्या आत आमच्या मागण्यांचा विचार न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडणार आहोत.
नानासाहेब मदने .अध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा.