जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सममेद शिखरजी यास पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ फलटण शहरातील सकल जैन समाजाच्या वतीने बुधवार दि.२१/१२/२०२२फलटण बंद आयोजन करण्यात आले आहे.
या निर्णयाच्या निषेधार्थ फलटण शहर तसेच तालुक्यातील सर्व जैन बांधव दिवसभर आपली दुकाने बंद ठेवणार आहेत. दरम्यान शहरातून सकाळी नऊ वाजता मोर्चा काढणार असून त्यानंतर जैन समाजाच्या भावनांचे निवेदन प्रांतअधिकारी तहशील अधिकारी यांना दिले जाणार आहे. हा मोर्चा श्री 1008 चंद्रप्रभु दिगंबर जैन मंदिर येथून निघणार असून मारवाड़ पेठ मार्गे शुक्रवार पेठ, शंकर मार्केट, शिंपी गल्ली, बारामती चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे भगवान महावीर स्तंभ,डेक्कन चौक ,महात्मा फुले चौक मार्गे तहसील कार्यालयावर जाणार आहे व त्याना निवेदन देण्यात येणार आहे.
श्री सम्मेद शिखरजीला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ संपूर्ण भारतभर जैन समाजाच्या वतीने निषेध नोंदविण्यासाठी बंदचे आयोजन केले जात आहे.
तरी फलटण शहर तसेच तालुक्यातील सर्वानी बंद ठेऊन निषेधाला पाठींबा द्यावा अशी विनंती जैन समाजाच्या वतीने करण्यात आली आहे