सातारा- श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या संकल्पनेतून व कर्तव्य सोशल ग्रुप, सातारा आणि सेवासदन लाईफ लाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक ७ रोजी सकाळी ९.०० वा. ते सायंकाळपर्यंत आर्यांग्ल हॉस्पिटल, सातारा येथे मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आजारांची मोफत तपासणी व निदान करून सर्व प्रकारचे औषधोपचार मोफत करण्यात येणार आहेत. तसेच सर्व प्रकारची ऑपरेशन ( शस्त्रक्रिया) मोफत करण्यात येणार आहेत. शिबिरात हृदयविकार, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, जनरल सर्जरी – स्त्रीरोग, यूरोलॉजी, मेंदूच्या शस्त्रक्रिया, मेडिसीन- फुफ्फुस रोग, ऑर्थोपेडिक व पॉलिट्राॅमा, कान, नाक, घसा तपासणी व उपचार तसेच रुग्णांच्या ७ प्रकारच्या रक्ताच्या चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत.
तरी, या आरोग्य सुविधेचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन कर्तव्य सोशल ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी विलास कासार, विजय देशमुख, जितेंद्र मोहिते, दीपक भोसले, चंदन घोडके अथवा
9822189787, 9420772773,7058054418, 9881896014, 9372178211 येथे संपर्क साधावा.