पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आठ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
पाचगणी : कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीतही जिल्हा परिषदे कुडाळ शाळेने सन 2020- 2021पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल संपादन करीत शाळेचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले असून शाळेने ही नेत्रदीपक कामगिरी साधली आहे.
कोरोना कालखंडातही विद्यार्थ्यांचे शिक्षण विविध माध्यमातून सुरू ठेवून त्यांना शिक्षण प्रवाहात ठेवण्याचे काम कुडाळ शाळेतील शिक्षकांनी सुरू ठेवले. शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून तर कधी प्रत्यक्ष भेटीतून ज्ञानू ज्ञानाचे धडे दिले. यामुळेच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेच्या तन्मय संतोष जोशी- 254, आर्यन गणेश वारागडे-254, वैष्णवी शरद नलवडे -248, आर्या सचिन माळेकर-248, हिना मोहमंद अन्सारी-234, सिद्धी संतोष पोफळे -230, रिद्धी संतोष पोफळे-228, प्रांजली प्रविण कोरडे-224 या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
या विद्यार्थ्यांना संदीप किर्वे, दिपाली कुंभार, बन्सीधर राक्षे व मुख्याध्यापक जयश्री गायकवाड, सर्व सहकारी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
शाळेच्या यशाबद्दल उपसभापती सौरभ शिंदे, गटशिक्षणाधिकारी अरूणा यादव, माजी गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, विस्तार अधिकारी कल्पना तोडरमल, चंद्रकांत कर्णे, केंद्रप्रमुख
अरविंद दळवी, सर्व पालक व ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य कुडाळ यांनी अभिनंदन केले.