डॉ. कल्याण बाबर : माणदेशी फौंडेशन वतीने महिलांना पालेभाज्यांच्या बियाण्यांचे वाटप
पाचगणी : आपल्या नित्य अन्न प्रक्रियेत सकस आहाराची अत्यावश्यकता असून, त्याकरिता पौष्टीक द्रव्ये शरीरासाठी गरजेची आहेत. याकरिता पालेभाज्या खाल्याने आपण सदृढ रहाणार आहे. पालेभाज्या शेतीला प्राधान्य कर्म देत महिलांनी आत्मनिर्भर झाले पाहिजे, असे प्रतिपादन विशेष अन्न तज्ञ अन्नशास्त्र व तंत्रज्ञान कृषी विकास विज्ञान केंद्र बोरंगावाचे डॉ. कल्याण प्रभाकर बाबर यांनी केले.
भिलार, ता. महाबळेश्वर येथे माणदेशी फौंडेशनच्या वतीने आणि वैशाली भिलारे यांच्या सहयोगातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांना कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण तसेच बि- बियाणे वाटप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बाबर बोलत होते. या कार्यक्रमास माणदेशी फौंडेशनच्या प्रोग्राम डायरेक्टर शोभा फाळके, किर्ती किर्तने, स्वाती फाळके, ज्योती पिसाळ, सनी थोरात, आशा जंगम, संतोष जंगम, संजय औतारी, मयूर पवार, नीता गावडे, सरपंच शिवाजी भिलारे, प्रवीण भिलारे , सुनिता भिलारे, मंगल भिलारे, वंदना भिलारे, वैशाली कांबळे आदी उपस्थित होते.
पुढे बाबर म्हणाले, सदृढ निरोगी आयुष्य हवे असेल पौष्टीक अन्न ग्रहण करणे काळाची गरज आहे. त्यामुळे आपल्या शरीराला व्हिटॅमिन मिळणार आहेत.
शोभा फाळके यांनी माणदेशी फौंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती या वेळी दिली. माणदेशी फाउंडेशन हे महिलांना सक्षम करून स्वतः पायावर उभे करून आत्मनिर्भर होण्याचे महत्व पूर्ण योगदान देते. माणदेशी फौंडेशनच्या वतीने उपस्थित महिलांना पाले भाज्यांच्या बि-बियाण्याचे मोफत वाटप आणि मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आरोग्याचा गुरुमंत्रया
उपस्थित महिलांना आरोग्याचा गुरुमंत्र म्हणून सुप्रिया भिलारे व दीपाली ओंबळे यांनी महिलांच्या आरोग्याशी निगडित अशा विघटन होणाऱ्या कॉटन सॅनिटरी नॅपकिनचे प्रात्यक्षिक दाखवून नवीन व्यवसाय संदर्भात मार्गदर्शन केले.