इंडियन प्रेस क्लब या पत्रकारांच्या राष्ट्रीय संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी तन्मय पाटील यांची निवड
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : इंडियन प्रेस क्लब या राष्ट्रीय व केंद्रीय स्तरावरील पत्रकारांच्या संघटनेची आज कोल्हापूर येथे मीटिंग पार पडली.यामध्ये केंद्रीय व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पत्रकार व पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.यामध्ये जिल्हास्तरावरील निवडी करण्यात आल्या. त्यामध्ये सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून मंद्रुळकोळे (ढेबेवाडी) ता.पाटण येथील अभ्यासू व्यक्तिमत्व पत्रकार तन्मय पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.पत्रकारितेचे अधिकृत शिक्षण घेतलेले उच्चविद्याविभूषित व बातम्यांच्या निमित्ताने समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचलेले,त्याच बरोबर आपल्या मृदू स्वभावाने दुसऱ्याला आपलेसे करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचा आज खरा गौरव झाला.गेल्या दहा वर्षांपासून ते या पत्रकारिता क्षेत्रात मोलाच काम करत आहेत.इलेक्ट्रॉनिक माध्यम म्हणजे यूट्यूब न्यूज चैनल च्या माध्यमातून ते घराघरात पोहोचले.घरची परिस्थिती अत्यंत जेमतेम असून सुद्धा त्यांनी स्वतः कराडसह सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.या क्षेत्रातील यश हे कोणत्याही गॉडफादर शिवाय त्यांनी मिळवलेले आहे.आज खऱ्या अर्थाने त्यांचा गौरव म्हणजे पाटण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
यावेळी इंडियन प्रेस क्लब चे केंद्रीय अध्यक्ष विवेक पाटील,राजेंद्रकुमार शिंदे; केंद्रीय उपाध्यक्ष,विकास कुलकर्णी; केंद्रीय सरचिटणीस, हाजी अब्दुल शेख;केंद्रीय कार्याध्यक्ष, सदाशिव खटावकर .कराड,जावेद मुजावर;खजिनदार,राज्य कार्यकारिणी सदस्य,सायरा शेख;ठाणे,प्रदीप कोल्हे;सांगली,प्राजक्ता किंने;रत्नागिरी शहाजहान आतार;महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदी मान्यवरांसह अनेक पत्रकार यावेळी मुख्य कार्यालय करवीर जि. कोल्हापूर येथे उपस्थित होते.