साखरवाडी प्रतिनिधी
माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून साखरवाडी गावातील प्रलंबित रस्त्यांसाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे व या रस्त्यांचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे साखरवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य विक्रमसिंह भोसले यांनी सांगितले.
साखरवाडी बाजारपेठ येथील रस्त्याची मागील बऱ्याच वर्षापासून दुरावस्था झाल्याने व्यापारी व नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत होता सदर रस्त्याचे काम व्हावे अशी मागणी माजी सरपंच विक्रमसिंह भोसले व उपसरपंच अक्षय रुपनवर यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे केली होती याची ताबडतोब दखल घेऊन बाजारपेठेतील रस्त्यासाठी १५ लाख व पिंपळवाडी येथील गणेश मंदिर ते विठ्ठल मंदिर रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी १० लाख रुपयांच्या निधीची तरतूद खासदारांनी केली असून त्याबद्दल
साखरवाडी ग्रामपंचायत
सरपंच,उपसरपंच,सर्व सदस्य,ग्रामस्थ यांच्यावतीने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे आभार मानले.