महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्यातील सर्व शासकीय ग्रंथालये , सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये , राज्य, विभाग,जिल्हा ग्रंथालय संघ, संशोधन संस्थानी चालवलेली शासनमान्य ग्रंथालये , ग्रंथालय सेवा , अभ्यासिका, वाचन कक्ष इत्यादी सेवा दिनांक ३१ जुलै २०२० पर्यंत बंद ठेवण्यात याव्यात व अधिवेशन, कार्यशाळा , चर्चासत्र, ग्रंथोत्सव इत्यादी सारख्या कार्यक्रमाचे आयोजन करू नये असे संचालनालयाचे परिपत्रका अन्वयेसुचित करण्यात आले होते. सार्वजनिक ग्रंथालये हि अनौपचारिक शिक्षणाचे काम करीत आहेत . ग्रंथालय सेवा सुरू केल्याने ग्रंथ देव-घेव कक्षात व वृत्तपत्र वाचन कक्षात येणारे वाचकांमुळे ग्रंथालयात गर्दी होण्याची शक्यता आहे .
त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही,.अशा परिस्थितीत ग्रंथालयात येणारे वाचक ,ग्रंथालय सेवक यांना कोरोना विषाणू संसर्ग होण्याची शक्यता विचारात घेवून ग्रंथालय सेवा व सांस्कृतिक कार्यक्रम , कार्यशाळा, चर्चासत्रे , अधिवेशन इत्यादी सार्वजनिक स्वरुपाचे कार्यक्रम घेण्यास ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. शासन अधिसूचनेत कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासंदर्भातील वेळोवेळी निर्गमित केलेले सर्व आदेश कायम ठेवणेत आले असून , राज्यातील लाॅकडाऊन कालावधी दिनांक ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढविण्यात आला आहे . सदर लाॅकडाऊन कालावधी वाढविताना , कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपणे अंमलबजावणी करणेचे निर्देश शासनाने दिले आहेत.
त्या अनुषंगाने राज्यातील शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत ग्रंथालये बंद ठेवावीत , असे प्र. ग्रंथालय संचालक सुभाष हि. राठोड यांनी परिपत्रकात नमुद केले आहे . शुक्रवार, दिनांक ३१ जुलै रोजी सुभाष हि. राठोड ग्रंथालय संचालक पदावरून निवृत्त झाले , त्यांच्या जागी ग्रंथालय संचालनालयाच्या पहिल्या महिला ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले यांनी पदभार स्विकारला .