कायदेशीर बाबी असताना देखील बळजबरीने गुंडांच्या मदतीने जमीन बाळकविण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सातारा :
जांब बुद्रुक तालुका कोरेगाव येथील बबनराव कृष्णा चव्हाण यांची जमीन आहे परंतु कायदेशीर प्रोसेस चालु असताना देखील तुकाराम सुतार नामक व्यक्तीने बेकायदेशीर रित्या गुंडांच्या मदतीने चव्हाण यांच्या घराची मोडतोड करून घरावरील पत्रे व अन्य वस्तू बळजबरीने नेल्या व धारदार शस्त्राचा धाक दाखविल्याने बबनराव चव्हाण कुटुंबातील सदस्य घाबरून गेले व भयभीत झाल्याने स्वतः ला वाचविण्यासाठी सैरभैर धावू लागले.
बबनराव चव्हाण कुटुंबातील व्यक्ती घाबरल्याने त्यांनी ही गोष्ट निवेदनाद्वारे कोरेगाव तहसीलदार यांना रामोशी समाजातील व्यक्ती व सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट घेऊन सांगितले. तुकाराम सुतार व अन्य ३० ते ४० गुंडांचा लवकरात लवकर बंदोबस्त करा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असे आवाहन समस्त रामोशी समाज्यातर्फे करण्यात आले आहे याच्या प्रति जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक कोरेगाव यांना याच्या प्रति देण्यात आल्या आहेत. तसेच धारदार शस्त्राचा वापर करणाऱ्या तुकाराम सुतार व ३० ते ४० गुंडांचा लवकरात लवकर बंदोबस्त करून घेऊन गेलेला पत्रा अन्य वस्तू माघारी देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.






















