एकूण बाधीत 418 , कोरोनामुक्त 273 , उपचाराखाली 123 , मृत्यू 22 .
महाराष्ट्र न्यूज प्रतिंनिधी पाटण :- संजय कांबळे
पाटण तालुक्यात गुरुवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात आणखी 13 व्यक्तींचा कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आला. सध्या एकूण 123 बाधीतांवर विविध रूग्नालयात उपचार सुरू असून आत्तापर्यंत तब्बल 273 व्यक्तींनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती उप विभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. आर. बी. पाटील यांनी दिली.
पाटण तालुक्यात कोरोनाग्रस्तांचे वाढत्या रुुुुग्ण संख्यायेने तालुक्यात घबराट निर्माण झाली आहे, गुरूवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात पाटण येथील 31, 16, 37, 33 वर्षे पुरूष, 38, 17, 60, 35, 14, 39, वर्षे महिला व 6 , 3 , 8 वर्षे बालक या तेरा जणांचा पाॅझिटीव्ह अहवाल आला. या बाधीतांना पुढील उपचारासाठी रूग्नालयात दाखल करण्यात आले आहे तर त्यांच्या संपर्कातील कुटुंबीय, नातेवाईक आदी हाय रिस्कमधील व्यक्तींना इन्स्टीट्युशल क्वारंटाइन करण्यात आले आहे. सध्या एकूण 123 रूग्नांवर कृष्णा, सह्याद्री हाॅस्पीटल कराड, सिव्हिल हाॅस्पीटल सातारा व कोरोना केअर सेंटर पाटण येथे तर ज्यांना कोरोना झाला आहे परंतु त्यांच्यामध्ये कोणतीही कोरोना लक्षणे आढळून आली नाहीत व घरी त्यांच्याकडे सुविधा उपलब्ध आहे अशांना होम क्वारंटाइन करून तेथे त्यांचेवर पुढील उपचार सुरू आहेत. शुक्रवारी नेरळे येथील 47 व 28 वर्षे पुरूष, कोयनानगर 55 वर्षे पुरूष, पापर्डे 13 व 43 वर्षीय महिला, 35 वर्षे पुरुष अशा सहा व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडून आगामी सात दिवसांसाठी होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. आत्तापर्यंत एकूण 273 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. तर यात 22 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत तालुक्यातील कोरोना बाधीतांची संख्या तब्बल 418 इतकी झाली आहे . बाधीतांच्या संपर्कातील कुटुंबीय व नातेवाईक आदी हाय रिस्कमधील व्यक्तींना पाटण येथील प्रियदर्शनी महिला वसतीगृह, मिल्ट्री बाॅइज होस्टेल, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जुने वसतीगृह व तळमावले येथील कोरोना केअर सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

पाटण शहरात रुग्ण वाढले
दरम्यान पाटण शहरात अल्पावधीत कोरोना रूग्नांची वाढती संख्या व मृत्यू दर हा सार्वत्रिक चिंतेचा विषय बनला आहे. गुरूवारी दुपारी येथील ग्रामीण रुग्णालयात घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन चाचणीत रामापूर येथील दोघांचा तर रात्री आलेल्या स्वॅब चाचणीत देवकांत वस्तीतील एकाच कुटुंबातील नऊ तर चव्हाण गल्लीतील एक आई व मुलाचा असा एकूण 13 व्यक्तींचा अहवाल पाॅझिटीव्ह आला. शुक्रवारी येथील अॅन्टीजेन चाचणीत भोकरशेत व रामापूर येथील प्रत्येकी एक अशा दोघांचा अहवाल पाॅझिटीव्ह आला . आतापर्यंत शहरातील 59 व्यक्तींना कोरोनाची लागन झाली त्यापैकी चौघांचा मृत्यू तर पाच व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 50 बाधीतांवर विविध रूग्नालयात उपचार सुरू आहेत . शुक्रवारी आणखी 37 व्यक्तींचे स्वॅब नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत त्यांचे अहवाल शनिवारी रात्री उशिरा येण्याच्या शक्यता आहेत.
कोरोना कक्षात गैरसोय
पाटण येथील उभारलेल्या काही कोरोना सेंटरमध्ये बाधिताच्या सहवासातील लोकांना ठेवण्यात आले असून याठिकाणी महिला व लहाण बालकांची अन्न व पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे, बाहेर जोरदार पाऊस व थंडी आहे तरी आंघोळीला गरम पाणी मिळत नाही, यामुळे लहान बालकांची प्रकृती बिघडत आहे, याबाबत कोणीही ऐकायला तयार नाही, अशी माहिती विलगिकरण कक्षातील नागरिकांनी दैनिक महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधीशी मोबाईल वरून संपर्क साधून दिली,
































