भोर प्रतिनिधी.
वेल्हा तालुक्यातील गजबजलेल्या ठिकाणी हॉटेल विशाल मध्ये चहा पीत बसलेला तरुण नवनाथ उर्फ पप्पू रेणुसे रा.पाबे ता. वेल्हा याची पाच जणांनी बेछूट गोळीबार करून हत्या केल्याची घटना वेल्हे तालुक्यात घडली. हत्या करून हल्लेखोर लगेच पसार ज्यामध्ये चार तरुणांसह एक मध्यमवयीन व्यक्तीचा समावेश असल्याचे समजते.हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. परंतु जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला.घटनेचा तपास वेल्हे पोलीस स्टेशनचे ए.पी.आय.पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार बांदल, पोलीस कर्मचारी अडवाल, धिवार,बर्गे सोमवंशी करीत आहेत.