महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : कोल्हापूर
कोठारे व्हिजन प्रस्तुत दख्खनचा राजा जोतिबा ही मालिका वादाच्या भोवऱ्यात आली आहे.महाराष्ट्र ,कर्नाटक ,आंध्रप्रदेशराज्यातील भाविकांच कुलदैवत श्री जोतिबा यांचा मालिकेत दाखवला जाणारा इतिहास हा केदारविजय ,करवीर माहात्म्य या पौराणिक ग्रंथा सोबत मिळता जुळता नसून चुकीची माहिती या मालिकेत दाखवली जात आहे अशी माहिती पुजारी जोतिबा देवस्थान वाडी रत्नागिरी यांनी दिली आहे.
मालिकेतील जोतिबा देवाची भाषाशैली योग्य नसून कथेचा पूर्णपणे गोंधळ उडालेला असून यमाई ,अंबाबाई,चोपडाई यांच्या व्यक्तीरेखा लेखकाला समजल्या नाहीत का? रत्नासुराला अंबाबाई ने कधी वरदान दिले ?असा प्रश्न भाविकांकडून उपस्थित होत आहे.वाडी रत्नागिरी या डोंगराचे प्राचीन नाव ‘मैनाकगिरी’ होते, याचा विसर लेखकाला पडलेला आहे.यांसारख्या अनेक गंभीर चुका मालिकेत झाल्या आहेत.मालिकेच्या प्रक्षेपणापूर्वी पुजार्यांकडून योग्य माहिती घेतली जाईल व मालिकेतून कोणतीही चुकीची माहिती दिली जाणार नाही, असा शब्द निर्माते महेश कोठारे यांनी पुजार्यांना दिला होता. प्रत्यक्षात मात्र यात अनेक चुकीच्या घटना दाखवल्या जात आहेत यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. कोठारे यांनी केदारविजय ग्रंथ, धार्मिक, ऐतिहासिक दस्तएैवज यांचा योग्य तो अभ्यास करून खरा इतिहास नाथभक्तांच्या समोर आणावा सोबतच मालिकेत ग्रंथाचा आधार न घेता होणारे सादरीकरण हे कोणत्याही भक्तांना पटणार नसून मालिकेतील चुका त्वरित दुरूस्त कराव्यात अशी मागणी सर्व पुजारी वर्ग ,भाविक यांच्याकडून केली जात आहे.