दहिवडी प्रतिनिधी: एकनाथ वाघमोडे
मलवडी केंद्राचा बाल आनंद मेळावा बिदाल येथील सोसायटीच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने यावेळी विद्यार्थ्यांचा कलामहोत्सव अर्थात सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन केले होते. बिदाल ग्रामपंचायतीच्यावतीने मुला-मुलींना पथकाचे झांज पथकाच्या टी-शर्टचे वाटप करण्यात आले.
या बाल आनंद मेळाव्यामध्ये मलवडी केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या बिदाल,मलवडी,भोसलेवस्ती,फुलेवाडी,कासारवाडी,बोडके, शिरवली,नवलेवाडी,सत्रेवाडी,आंधळी, माणगंगानगर,तेलदरा,शेरेवाडी आदी शाळांनी सहभाग नोंदवला होता.
यावेळी गटशिक्षणअधिकारी माणिक राऊत, विस्तार अधिकारी लक्ष्मण पिसे, माजी सभापती कविता जगदाळे, केंद्रप्रमुख श्री.आवळे,शिक्षक बँकेचे संचालक संजीवन जगदाळे, विवेक जगदाळे, रावसाहेब देशमुख यांच्यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक केंद्रप्रमुख श्री.आवळे यांनी केले तर सूत्रसंचालन हणमंत जगदाळे यांनी केले .