सातारा : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जाती-जातीमध्ये सलोखा निर्माण होण्यासाठी आणि सर्व भारतीय एकसंध राहण्यासाठी मेरी माटी मेरा देश हा कार्यक्रम संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. ८ ऑगस्ट क्रांतीदिनी या कार्यक्रमाचा शुभारंभ देशात करण्यात आला आणि देशभरात विविध ठिकाणी यासाठीचे कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत १० ऑक्टोंबर रोजी हा कार्यक्रम किल्ले प्रतापगड येथे होणार होता. परंतु काही कारणांमुळे या ठिकाणामध्ये बदल झाला असून मेरी माटी मेरा देश हा उपक्रम शिवतीर्थ पोवई नाका,सातारा या ठिकाणी सकाळी ११ वाजता होणार आहे अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी दिली.