महाराष्ट्र न्यूज मसूर प्रतिनिधी :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत परंतु शिक्षण चालू आहे. मात्र सातारा जिल्हयातील 32 टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नाहीत असे विद्यार्थी शिक्षण प्रवाहात राहावे याचा विचार करुन सातारा जिल्हयातील सर्व व्य्वस्थापनांच्या , सर्व माध्यमाच्या माध्य्मिक व उच्च् माध्य्मिक शाळेतील मुख्याध्यापकांनी ऑनलाईन शिक्षणाबरोबरच शिक्षक मित्रांची मदत व समुपदेशकांचे मार्गदर्शन यासह सर्व पर्यायांचा उपयोग करावा असे आवाहन सातारा जिल्हा माध्य्मिक शिक्षण विभागाचे शिक्षणअधिकारी राजेश क्षीरसागर यांनी परिपत्रकाद्वारे केले आहे.
सध्या कोरोना संकटामुळे राज्यात शाळा बंद आहेत मात्र ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण चालू आहे. यामध्ये व्हर्च्यूअल क्लास,व्हीडीओ दवारे तसेच दूरदर्शनवरील टीलीमीली कार्यक्रम ,गुगल क्लासरुम यांचा समावेश आहे.युटयूब चॅनेल, जिओ चॅनल,दिक्षा ॲपसह अन्य शैक्षणीक ॲप या द्वारे ही शिक्षण दिले जात आहे. सातारा जिल्हयातील शाळांचा विचार करता सुमारे 32 टक्के विद्यार्थ्याकडे अँड्राईड मोबाईल नाहीत तर काहीजणाकडे साधे फोन आहेत.स्मार्ट फोन किंवा साधे फोन नसणारे विद्यार्थी शिक्षण प्रवाहापासून दूर राहण्याची शक्यता आहे.तर काही ठिकाणी मोबाईल रेंजची समस्या आहे अशावेळी विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी शाळा स्तरावर शिक्षक मित्र व समुपदेशन या उपक्रमांचे आयोजन करावे व कोणीही विद्यार्थी शिक्षण् प्रवाहापासून दूर जाणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.
गावामध्ये निवृत्त शिक्षक, डी.एड,,बी.एड किंवा पदवीधर युवक ,युवती यांना स्वयंप्रेरणेने विनामोबदला शिक्षकमित्र म्हणून कार्य करण्याचे आवाहन करावे आणि कोरोना प्रतिबंधक उपाय योजना करुन स्मार्ट फोन नसणा-या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणावे यामध्ये कुठल्याही प्रकारे विद्यार्थी शिक्षणाचा ताण न घेता आनंददायी शिक्षण घेतील यासाठी प्रयत्न करावेत तसेच ऑनलाईन क्लासमध्ये जॉईन न होणारे विद्यार्थ्यांना नैराश्य येण्याची शक्यता पाहता फोनदवारे समुपदेशन करावे यासाठी स्वयंप्रेरणेने काम करणा-या व्यक्तींना,मंडळांना प्रेरीत करावे.ऑनलाईन शिक्ष्ण हे केवळ विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात ठेवण्यासाठी आहे ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यावी.
शासनस्त्रावरुन प्राप्त् होणा-या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. सातारा जिल्हयात व्यवसाय मार्गदर्शनासाठी 20 समुपदेशक नियुक्त आहेत. त्यांची यादी सर्व शाळांकडे उपलब्ध आहे ती पालकांना पाठवावी व कोविड-19 तसेच ताणतणावाबाबत त्यांचे समुपदेशन घेण्यास विद्यार्थी व पालकांना प्रवृत्त करावे,व्हर्च्यूअल क्लासमध्ये समूपदेशकांना लिंक देवून जॉईन केल्यावर थेट विद्यार्थ्यांशी त्यांचा संपर्क होउ शकेल त्यादॄष्टीने समूपदेशकांच्या संपर्कात राहून योग्य ती कारवाई करावी. असेही आवाहन शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.