महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
मौजे वडगाव (रताळवाडी रामदासनगर),वडगाव (उंब्रज ), इंदोली ता.कराड येथील अंतर्गत रस्त्याचे तसेच विविध विकास कामांचा उद्घाटन व भूमिपूजन सोहळा भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा. विक्रांतदादा पाटील, सातारा भाजपा जिल्हाध्यक्ष मा. धैर्यशीलदादा कदम, भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. विक्रमबाबा पावसकर, कराड-उत्तर निवडणूक प्रमुख मा. मनोजदादा घोरपडे, भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस मा. रामकृष्ण वेताळ आदी मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी सातारा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुरेशतात्या पाटील, कराड-उत्तर भाजपा अध्यक्ष शंकरकाका शेजवळ, कराड-उत्तर संयोजक महेशबाबा जाधव, लोकसभा संयोजक किसान मोर्चा सूर्यकांत पडवळ, कराड-उत्तर किसान मोर्चा अध्यक्ष प्रशांत भोसले, प्रदेश सरचिटणीस युवा मोर्चा सुदर्शन पाटसकर, सरचिटणीस शहाजीराव मोहिते यांच्यासह सरपंच, उपसरपंच, प्रमुख भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच इंदोली, वडगाव (उंब्रज) ग्रामस्थ महिला, युवक बहुसंख्येने उपस्थित होते.






















